Library Rules and Regulations

GENERAL RULES AND REGULATIONS

RULES FOR LIBRARY USE

  1. Use of Mobile Phone is not allowed in the Library
  2. ID Card is mandatory for using library.
  3. Students must sign in the Library entry register.
  4. Silence should maintain strictly in Library and Reading Room.
  5. Bags not allowed in the Library and stack area.
  6. Discipline and queue must be maintained in library.
  7. Read the Library Notice Board time to time for updates.
  8. BT is NON-TRANSFERABLE. Using someone else’s BT is a punishable offence.
  9. Co-operate the library staff for smooth functioning and library services.
  10. If you have any problem regarding library please contact to librarian.
  11. Only Admitted students and students with valid reason and valid permission from authority will be allowed to use the library. Outsiders and ex-students without permission are not allowed.
  12. Misbehavior in the library will be punished or penalized according to the college authority or library membership will be cancelled.
  13. Students must return the BT to the library and issue No due Certificate from the library otherwise no admit card will be issued by the college.
  14. Eating, spitting sleeping in the library is not allowed it will be treated as misbehavior and will be penalized as per the college authority
  15. Handle the Library Book carefully.
  16. Return the books on due date or renewed otherwise fine will be charged at the time of clearance.

 

GUIDELINES FOR REPROGRAPHIC SECTION

  1. The Photocopy/ Xeroxing service will be available for library books, journal article and question papers. Photocopy of outside papers or notes will be not provided.
  2. Rs 1/per page will be charged for photocopying.

 

GUIDELINES FOR ISSUE OF THE BOOKS

  1. A student will be provided two BT’s for issuing books from the library.
  2. BT is Non-transferable. Transferring self BT to other is a punishable offence
  3. Book will be issued on the valid BT holder only.
  4. Valid ID card is compulsory for issuing the books from the library.
  5. Books will be issued for a week and can renew for further week. If a student does not renew the book or return the book after the due date will charge a late fee Rupees 1/day.
  6. The student must check the book on issuing if found mutilated or torn pages must inform the library staff on the circulation counter otherwise the borrower will be held responsible for the same.
  7. If it is found that book is lost or damaged the borrower must replace with a new copy of the Book or have to pay the amount of the Book with the fine as per the college and library authority. 

 

GUIDELINES FOR READING SECTION

  1. Student must sign in the Reading Room Entry Register on entering the Reading Room.
  2. The Periodicals (Journals & magazines) will not be issued at home they will be available in library reading room only. Taking out the Journals and magazine outside the library is prohibited.
  3. While taking the book for reading room students must deposit his/her ID card at the Reading Room Counter.
  4. After reading the periodical (Journal, Magazine, Newspaper) keep it on the proper place or on the reading Room Counter.

 

GUIDELINES FOR INTERNET USE

  1. Students are expected to use the Internet responsibly. Internet access is limited to academic activities only and personal use is not permitted except free e-mail service. Academic activities include research and educational tasks.
  2. E-mails sent via the college computer system should not contain content that is deemed to be offensive. This includes the use of vulgar or harassing language/images.
  3. Transmitting, copying or downloading any material such as copyrighted material without the permission of copyright holder is prohibited.
  4. Allowing someone else such as your friend or relatives on your register user ID/ or internet access permission is prohibited.
  5. All sites and downloads may be monitored and/or blocked by college if they are deemed to be harmful or offensive.
  6. Attaching any devices such as pen drives, mobiles or any electronic or storage media without permission is prohibited.
  7. The installation of any software is strictly prohibited.
  8. Sending or posting discriminatory, harassing, or threatening messages or images on the Internet via college internet service are prohibited.
  9. Using computers to perpetrate any form of fraud, and/or software, film or music piracy, stealing, using, or disclosing someone else’s password without authorization is prohibited.
  10. Downloading, copying or pirating software, images, videos and electronic files that are copyrighted or without authorization is prohibited.
  11. Sharing confidential material, pictures, or proprietary information outside of the College, Sending or posting information that is defamatory to the college, its activities, colleagues and teachers is prohibited.
  12. Passing off personal views as representing those of the organization is prohibited.
  13. The college do not accept any responsibility or liability for any matter, issue, claim, action, inaction proceeding, demand, damage, loss, cost, charge or expense which any user may suffer or incur, either directly or indirectly, through the use of this service.
  14. Internet user will be fully responsible for consequences arising during his session.
  15. Violation of the above could result in disciplinary and/or legal action leading up to and including termination from college. Users may also be held personally liable for damages.

ग्रंथालय नियम

  1. ग्रंथालयात भ्रमनध्वनी (Mobile phone) वापरण्यास मनाई आहे.
  2. ग्रंथालयाचा वापर करताना महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत बाळगावे.
  3. प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रंथालयातील प्रवेश द्वारातील नोंद वहीत स्वाक्षरी करावी.
  4. ग्रंथालयात व वाचन कक्षात शांततेचे पालन करावे.
  5. ग्रंथालयातील ग्रंथ कक्षात बॅग्स आनु नयेत.
  6. ग्रंथालयातील बदलाकरिता व अद्ययावत माहिती करिता ग्रंथालयातील सुचना फलक पहावे.
  7. बी टी. (सभासद तिकीट) हे अहस्तांतरनीय आहे; ते इतरास देउ नये अथवा घेउ नये.
  8. ग्रंथालयाच्या सुव्यवस्थित संचालनाकरिता ग्रंथालय कर्मचारी याँना सहकार्य करावे.
  9. ग्रंथालया बाबत आपनास काही अडचणी असल्यास ग्रंथपाल यांचेशी संपर्क साधावा.
  10. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यानाच ग्रंथालयाचा व ग्रंथालयीन सेवांचा उपयोग करता येईल, तसेच मा. प्रचार्य यांचे अनुमतीने नुसार विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल. या व्यतीरिक्त इतरास प्रवेशास प्रतिबंध आहे.
  11. ग्रंथालयात विद्यार्थ्याने गैरवर्तणुक केल्याचे निदर्शनास आल्यास अनुशासनात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
  12. विद्यार्थ्याने वर्षाचे शेवटी व परिक्षेच्या पुर्वी बी टी. (सभासद तिकीट) परत करणे अनिवार्य आहे.
  13. ग्रंथालयात खाद्य पदार्थ आणण्यास/ खाण्यास /थुंकण्यास तसेच झोपण्यास मनाई आहे असे केल्यास गैरवर्तन मानल्या जाईल व अनुशासनात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
  14. ग्रंथ काळजीपुर्वक हाताळावे. ग्रंथ देय दिनांकास अथवा देय दिनांकापुर्वी ग्रंथालयास परत करावे किंवा नुतनीकरन करुन घ्यावे अन्यथा वर्षाचे शेवटी दंड आकारण्यातयेईल.
  15. ग्रंथालयात शिस्ततेचे पालन करावे.

ग्रंथालयातील इंटरनेट सेवा वापरासंबधीचे धोरण

महाविद्यालयाच्या ध्येय धोरणाषी सुसंगतीत असेच धोरण  ग्रंथालयाने महाविद्यालयातील सर्व की जे ग्रंथालयातील इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ इच्छितात याच्या संदर्भात अवलंबिलेले आहे. हे धोरण ग्रंथालयातील इंटरनेट सेवेचा वापर करणा-या सर्वानांच लागू असून या धोरणाचा भंग केल्यास वापर करणा-या व्यक्तीविरूध्द षिस्तभंग तसेच कायदेषीर कार्यवाही करण्यात येईल. त्याप्रमाणेच इंटरनेट, कॉम्पूटर यांचे नुकसान केल्याचे आढळून आल्यास त्यांची नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

कॉम्पूटर, इंटरनेट, ई-मेल्स, इत्यादी वापरासंबंधीचे नियम व अटी

  1. इंटरनेटचा वापर रोजगारविषयक व शैक्षणिक प्रामुख्याने संशोधन,शिक्षणविषयक इत्यादी तसेच ई-मेल यापुरताच मर्यादीत आहे. इंटरनेटचा वापर जबाबदारीने व काळजीपुर्वक करणे आवश्यक आहे.
  2. ग्रंथालयातील इंटरनेट, कॉम्पूटर इत्यादी महाविद्यालयाची मालमत्ता असून त्याचा वापर काळजीपुर्वक करावा़.
  3. महाविद्यालयाच्या संगणकावरून ई-मेल्स मार्फत महाविद्यालयासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या माहीतीची तसेच आपत्तीजनक साहीत्य, भाषा, चित्र, याची देवाण घेवाण करता येणार नाही.
  4. इंटरनेटवरील साहीत्याचे परवानगीशिवाय डाऊनलोडींग करने तसेच सर्व हक्क सुरक्षित Copyrighted material असलेल्या साहित्याचे हस्तांतरण, कॉपी अथवा डाउनलोड करने प्रतिबंधीत आहे.
  5. महाविद्यालयातील इंटरनेट सेवेच्या माध्यमातून आक्षेपार्ह, आपत्तीजनक, भेदभावात्मक धमकीवजा लिखित साहीत्य, अन्य साहित्य, फोटो, चित्र इत्यादींचा प्रसार व हस्तातंरण प्रतिबंधीत आहे.
  6. कोणत्याही Pirated सॉफ्टवेअरचे हस्तांतरण, कॉपी अथवा डाउनलोड करने प्रतिबंधीत आहे.
  7. महाविद्यालयातील कार्यक्रम, शिक्षक अन्य कर्मचारी अथवा विद्यार्थी यांचेबाबत आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर, साहीत्य प्रसारीत हस्तांतरीत करणे प्रतिबंधीत आहे. तसेच स्वतःची व्यक्तीगत मते महाविद्यालयातील कोणत्याही विभागाच्या नावे प्रसारीत करणे प्रतिबंधीत आहे. महाविद्यालयातील कॉम्पूटरमधील फाईल्स, साहीत्य, चित्रे, फोटो, Images यांचे महाविद्यालया बाहेर हस्तांतरण करणे प्रसारीत करणे प्रतिबंधीत आहे.
  8. इंटरनेटचा वापर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, चौर्यकर्म इतरांचा पासवर्ड माहीत करून घेणे या प्रकारच्या कोणत्याही गैरसंविधानीक कार्यासाठी करणे दंडणीय अपराध आहे.
  9. पेन ड्राईव्ह, मोबाईल अथवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चा कॉम्पुटरवरील वापर हा परवानगी शिवाय प्रतिबंधीत असेल.
  10. कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचे कॉम्पुटरमधील सम्मीलीकरण (installation/ Attachment) करता येणार नाही.
  11. स्वतःचा Username व Password अन्य व्यक्तीस (उदाः मित्र, नातेवाईक, इ) इंटरनेट वापरासाठी देणे प्रतिबंधीत आहे.
  12. इंटरनेट वापरकर्त्याव्दारे कोणत्याही प्रकारचा दुरूपयोग, हानी अथवा संबंधीत बाब घडल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कोणतीही जबाबदारी ग्रंथालय अथवा महाविद्यालय स्विकारणार नाही. यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी इंटरनेटचा वापर करणा-या व्यक्तीची असेल.

             इंटरनेट वापरासंबंधी काही समस्या असल्यास वापरकर्त्याने ग्रंथपाल (Librarian) यांचेशी संपर्क साधावा. वरील अटी व नियम हे इंटरनेटचा वापर करणा-या सर्वाना लागू असून त्याच्याशी इंटरनेट वापरकर्ता सहमत आहे असे मानण्यात येईल .
              वरील कुठल्याही अटीचा भंग झाल्यास योग्य ती शिस्तभंगाची अथवा कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार महाविद्यालयास आहे. याबाबत आवश्यकता वाटल्यास पोलिस कार्यवाही करण्याचा अधिकार देखिल महाविद्यालयास आहे.